तुळजापूर (प्रतिनिधी) - चैञशुध्द 1  गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा प्रारंभ असलेला सण दि. 9 एप्रिल मंगळवार रोजी येत असुन तो अवघ्या दोन  दिवसांवर आला आहे. गुढीपाडव्या पासुन चैञ नवराञ चैञ मासारंभ  होणार असुन, या दिवसापासून सर्वञ ग्रामदेवता याञा उत्सव आरंभ होत आहेत.

 गुढीपाडवा पुर्वतयारी साठी  लागणारे  साहित्य खरेदी करण्यासाठी  परिसरातील बाजारपेठांमध्ये नागरिक गर्दी करत आहेत.  गुढीपाडवा नववर्षाच्या प्रथम दिन पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी मातेस संपुर्ण सुवर्ण अलंकार घातले जातात. तसेच या दिवशी साखरेचा हार ही श्रीतुळजाभवानी मातेस घातला जातो. नववर्षाचा आरंभ कुलदैवत श्रीतुळजाभवानी दर्शनाने व्हावा म्हणून भाविक मोठ्या संखेने येतात. यात देशातील बंजारा समाजाच्या भाविकांची संख्या पन्नास टक्के असते. तिर्थक्षेञ तुळजापूर शहरासह परिसरात आजही घरगुती गुढ्या उभारल्या जातात. यात मोठ्या बाबुला वरच्या बाजुस साडी घालुन त्यात साखरेचा हार, लिंब वृक्षाचे फाटा व पालथा तांब्या घालुन गुढी उभारुन पुजा करतात. दुपारी पुरणावरचा नैवध दाखवतात व सांयकाळी सुर्य मावळतीला साखर नैवध दाखवुन गुढी उतरवातात.

काळ बदलला तर आजही पारंपारिक पध्दतीने गुढी उभारली जाते. तसेच पाडव्याला खास महत्त्व असलेल्या साखरेचे हार शहरातील  साखरेचे  हार  (माळा)  बाजारात विक्री आले आहे सत्तर रुपये किलो दराने विकले जात आहेत. यंदाच्या गुढीपाडवा उत्सवावर ग्रामीण भागात दुष्काळाची सावट असली तर शहरी भागात माञ उत्साह जाणवत आहे. शहरी भागातील सोनेचांदी दुकानदार, ईलेक्ट्रीक, इलेक्ट्रॉनिक दुकानदारांना ग्राहकांसाठी विविध स्कीम आणल्या आहेत. शोरुम भाविकांच्या आगमणासाठी सज्ज झाले आहेत.


 
Top