धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील दोन वर्षांचे बालक आझान अझहर शेख बाळाची आई स्वयंपाक करत असतांना बाळ खेळता खेळता फरशीवर पाय घसरून कडईतील गरम तेलात पडले त्यामुळे त्या बाळाच्या दोन्ही हाताला जखम झाली.आझान लहान असल्याने त्याच्या हाताची सर्जरी करणे अवघड होते,त्या बालकाला शहरातील चिरायु हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले होते. वैद्यकीय तज्ञ डॉ. विरेंद्र गवळी यांनी त्या बाळाचे ऑपरेशन अति काळजी पुर्वक करुन यशस्वी केले. परंतु आझानच्या आई वडीलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत दयणीय असल्याने उपचार दरम्यान झालेल्या खर्चाची रक्कम भरु शकत नव्हते. याबाबत अंजुमन वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष फेरोज पल्ला यांना याबाबत माहिती दिली. असता फेरोज पल्ला यांनी त्याचा सर्व उपचार दरम्यान झालेल्या खर्चाची जबाबदारी स्वीकारुन आज रोजी एकुण पंचेचाळीस हजार रुपये रकमेचा धनादेश चिरायु हॉस्पिटलचे वैद्यकीय तज्ञ डॉ. विरेंद्र गवळी यांच्याकडे सुपुर्द केला व रुग्ण बालकास खेळणी, चॉकलेट देण्यात आले.

आत्तापर्यंत विविध जाती धर्मातील लोकांना गेल्या दहा वर्षांपासून सोसायटीच्या वतीने एकुण अठ्ठेचाळीस लाख रुपयाची मदत करण्यात आली अशी माहिती फिरोज पल्ला यांनी दिली. चिमुरड्यासाठी ज्या दानशुर लोकांनी मदत केली त्यांचेही आभार मानुन पुढील काळात गरज पडल्यास सर्व दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन गरीब गरजू रुग्णांना आर्थिक मदत करावी असे आवाहन देखील सोसायटीच्या वतीने फिरोज पल्ला यांनी केले आहे. तर वॉटसॲप मधुन देखील काही दानशूर व्यक्तींना त्यांनी आवाहन केले आहे. यातुन गरीब गरजवंताना अंजुमन वेल्फेअर सोसायटीचा खुप मोठा आधार मिळत आहे.

डॉ.विरेंद्र गवळी व त्यांच्या सहकाऱ्यांचे देखील आभार फेरोज पल्ला यांनी मानले. तर डॉ. विरेंद्र गवळी यांनी अंजुमन वेल्फेअर सोसायटीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवेबद्दल व गरजवंत रुग्णास आर्थिक मदत याबाबत शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. विरेंद्र गवळी, डॉ. स्मिताताई गवळी, अंजुमन वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष फेरोज पल्ला, गणेश रानबा वाघमारे, अर्शद सय्यद, वसीम शेख, सर्फराज पटेल, रिझवान शेख व इतर सदस्य, हॉस्पिटल मधील कर्मचारी उपस्थित होते.


 
Top