कळंब (प्रतिनिधी)- लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी वस्ती,वाडी,तथा पिढीवर मतदान जनजागृतीसाठी उपविभागीय अधिकारी कळंब यांच्या सूचनेनुसार मौजे. मंगरूळ येथील बि.एल.ओ. डी.व्ही. सिरसेवाड पाटील यांनी आपल्या गावातील विखुरलेल्या वस्ती वाड्यावर जाऊन प्रत्यक्ष मतदारांना ईव्हीएम व व्ही व्ही पॅड याविषयी माहिती दिली. तसेच आपल्या प्रभागातील 85 प्लस वयोवृद्ध अपंग मतदारांचे मतदारांचे बारा ड नमुना फॉर्म भरून घेतले. तसेच मतदानाविषयी जनजागृती करून सर्व मतदारांना मतदान करणे हा आपला अधिकार असून तो हक्क आपण बजावलेच पाहिजे.असे सांगितले.


 
Top