धाराशिव (प्रतिनिधी)- महात्मा ज्योतीबा फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील जिल्हा परिषदेच्या अधिनस्त व फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित मोकळ्या जागेत आज रोजी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केले. तर बुध्द गुफा देखाव्याचे उद्घाटन करुन सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली.

तथागत गौतम बुद्ध यांची अडिशे किलो वजनाची सुंदर अशी मुर्ती पिओपीत कोरणारे मुर्तीकार विनोद माने व देखावा सादर करणारे शशी माने, विशाल सरवदे, शिवलिंग लोंढे, कमलाकर बनसोडे, अतुल चव्हाण, प्रदिप गायकवाड या कलाकारांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दि.12 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता आरोग्य शिबीर आयोजित केले असुन यात नेत्र, बिपी, शुगर तपासणी असुन तज्ञ असे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध आहेत. मतदार जनजागरण म्हणून बोलका बाहुला उदय पाटील यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या शिबिराचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीचे गणेश रानबा वाघमारे, दलित मित्र शंकर खुने, सिध्दार्थ बनसोडे, प्रशांत पाटील, उमेश राजेनिंबाळकर,अग्निवेश शिंदे,धनंजय राऊत,संजय गजधने, अंकुश पेठे,सचिन चौधरी, अंकुश उबाळे,धनंजय वाघमारे, देवानंद एडके,प्रवीण जगताप,बलभीम कांबळे,संग्राम बनसोडे सह पत्रकार बांधव उपस्थित होते.


 
Top