धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात क्रांतीसुर्य  ज्योतिबा फुले यांची जयंती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम शिक्षणमहर्षी डॉ .बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्याला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .जयसिंगराव देशमुख यांनी क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य बबन सूर्यवंशी, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.डॉ .एस .एस. फुलसागर, डॉ. केशव क्षीरसागर यांच्यासह मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी उपस्थित होते.


 
Top