तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत पूर्व तयारी मेळावा संपन्न झाला.
सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे उपस्थित पालक व अंगणवाडी कार्यकर्ती यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा कदम यांनी शाळा पूर्व तयारी गरज व महत्त्व प्रास्ताविकातून सांगितले.शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ज्ञ फक्रुद्दीन शेख यांनी पालकांना मार्गदर्शन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काशीनाथ नरसाळे, मालोजी वाघमारे, रामहरी पसारे, पल्लवी पवार, प्रतिभा जोगदंड, ज्योती गाढवे, सुशिल क्षिरसागर यांनी परिश्रम घेतले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ पदाधिकारी, शिक्षक पालक संघ पदाधिकारी, अंगणवाडी कार्यकर्ती, प्रवेश पात्र विद्यार्थीनी व पालक उपस्थित होते.