तुळजापूर (प्रतिनिधी)-  येथील  ‌‘श्री तुळजाभवानी नेत्रालय' च्या  प्रथम वर्धापन दिना निमित्ताने  भव्य नेत्ररोग निदान व दंत रोग तपासणी शिबीर बुधवार दि. 10 एप्रिल 2024 रोजी स. 10 ते दुपारी 2 यावेत डीसीसी बँके समोरील श्रीतुळजाभवानी नेञालय येथे आयोजीत केले आहे.अशी माहीती नेञरोगतज्ञ डाँ गिताजंली कुडलिक माने (एमएस) नेञरोग तज्ञ  यांनी दिली.

श्रातुळजाभवानी नेञालयात एका वर्षात तुळजापूर करांचा विश्वासास पाञ ठरले आहे. केवळ 1 वर्षात यशस्वी 250+ मोतीबिंदू शस्त्रक्रिया 100 हून अधिक मोफत नेत्ररोग तपासणी शिबीरे यशस्वीरित्या संपन्न  केले आहेत.

शिबीराचे वैशिष्ठे-(एम एस) नेत्ररोग तज्ञ,  मोफत नेत्र रोग व दंत रोग तपासणी शिबीर, मोतीबिंदू शस्त्रक्रियेवर 20% सुट, दंत रोग उपचारांवर विशेष सवलत. सर्व प्रकारच्या ऑप्टीकल्स्‌‍ वर 50% सुट, सर्व रक्त, लघवी तपासणीवर 50% सुट असणार आहे.

श्रीतुळजाभवानी नेञालयात पुढील  उपलब्ध सुविधा आहेत  सुसज्ज व प्रशस्त बाह्यरुग्ण विभाग  तज्ञ अनुभवी डॉक्टरांकडुन अत्याधुनिक यंत्रणाद्वारे सखोल नेत्र तपासणी. कॉम्प्युटर द्वारे चष्म्याचे नंबर काढण्याची सोय. अत्यल्प दरात बिनटाका मोतीबिंदु शस्त्रक्रिया. फेको इमल्सिफिकेशन (आधुनिक मशिन द्वार मोतिबिंदु शस्त्रक्रिया). धाराशिव जिल्यातील प्रथमच अत्याधुनिक फेको मशिन. मोतीबिंदु ऑपरेशन नंतर येणारी जाळी लेझरच्या सहाय्याने काढण्याची सोय. डोळ्यातील वाढलेले मांस, बुबुळाचे आजार, तिरळेपणा, काचबिंदु, लासरू निदान, उपचार व शस्त्रक्रिया. सुसज्ज ऑपरेशन थिएटर. मधुमेह व रक्तदाब रूग्णासांठी नेत्रपटल तपासणी- कॅशलेस सुविधा उपलब्ध.आहेत तरी या  शिबीरात नेञरोग तज्ञ डाँ. गिताजंली माने (एमएस) नेञरोग तज्ञ  व डॉ. नागेशनाथ बी. वाघमारे M.D.S. (Prosthodontist & Implantologist) हे रुग्णांची तपासणी करणार असुन तरी या शिबीराचा गरजुंनी लाभ घेण्याचे आवाहान श्री तुळजाभवानी नेत्रालयच्या प्रमुख डॉ. गिताजंली माने यांनी केले आहे.


 
Top