धाराशिव (प्रतिनिधी)-इस्लाम धर्मानुसार रमजान हा पवित्र महिना आहे. सदर रमजान महिण्यामध्ये मुस्लीम समाज बांधव महिनाभरात उपवास ठेवून (रोजे) इस्लाम धर्मानुसार सांगीतलेल्या पाच प्रमुख कामापैकी (इबादद) रोजा ठेवून जकात देतात. दि. 11/04/2024 रोजी रमजान ईद निमीत्ताने धाराशिव शहरातील मुस्लीम समाज बांधव सार्वजनिक नमाज पठनाकरीता ईदगाह मैदान धाराशिव येथे नमाज पठण करणेकरीता उपस्थीत राहतात. सदर कार्यक्रमाप्रसंगी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी उपस्थिती लावून सर्व मुस्लीम बांधवांना रमजान ईद निमीत्त शुभेच्छा दिल्या.

तसेच शहरातील प्रतिष्ठीत व जेष्ठ मुस्लीम बांधवांची भेट घेवून शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर,  रवी कोरे, आबेद सय्यद, सय्यद आलेद साहेब, खलील, मोहीब शेख मालक, शहबाज पठाण, रिजवान शेख, अहमद कुरेशी, गफार शेख, शबनम बाजी, अझर पठाण, अतीक उल्लाह हुसैनी, मुजीब काझी, साबेर सय्यद, कलीम कुरेशी, छोटा साजीद, अफरोज फिरजादे, सद्दाम काझी आदीसह धाराशिव शहरातील शेकडो मुस्लीम समाज बांधव  उपस्थीत होते.


 
Top