धाराशिव/उमरगा (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील अनेक गावांत विजेचा गडगडाटासह वादळी वारा, अवेळी झालेल्या पावसाने शनिवारी (दि.20) दुपारनंतर सुमारास झोडपल्याने काढणीला आलेल्या ज्वारी, पपई, आंबे, कलिंगड, पॉलीहॉऊस, भाजीपाला फळपिकांचे मोठे नुकसान झाले. तर जनावरेही दगावले आहेत.

धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसापासून ढगाळ वातावरण होते. अधूनमधून अवकाळी पाऊस ही पडत होता. या पावसामुळे शेतकऱ्यांचे थोडेफार नुकसान झाले होते. परंतु शनिवारी दुपार नंतर झालेल्या वादळीवाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ग्रामीण भागात अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले. आंबाचे प्रचंड नुकसान झाले. पॉलीहाऊस उडाले आहेत. उमरगा शहर, परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह झालेल्या अवकाळी पावसाने काढणीला आलेली ज्वारी सोबतच आंबा, पपई, कांदा, भाजीपाला आणि फळबागा उध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात आले आहेत. कडबा भिजल्याने पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला. वादळी वाऱ्यामुळे काढणीला आलेले ज्वारी पिकांसह आंबा, पपई व कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट व अवकाळी पावसात वीज पडून मुरुम शिवारात बियम्मा शेख यांच्या मालकीच्या तीन तर अशोक देडे यांच्या चार शेळ्या वीज पडल्याने दगावल्या. तलमोड येथे चंद्रकांत पिस्के यांच्या मालकीची गाय, तुगाव येथे व्यंकट करगले यांची म्हैस व तुरोरी येथे शिवाजी जाधव यांच्या मालकीची गाय दगावली आहे.


पंचनामे करण्याचे आदेश

भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी रविवारी सकाळी नुकसानग्रस्त भागात फिरून पाहणी केली. पत्रकारांशी बोलताना निसर्ग कोपल्याप्रमाणे रात्रीचा पाऊस आणि वादळी वारे झाले आहे. या संदर्भात आपण कृषी, महसूल व ग्रामविकास विभागास बोललो आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यास आचार संहितेची कोणतही अडचण येणार नाही. निकषाच्या बाहेर जावून आपण शेतकऱ्यांना मदत करू असे आमदार पाटील यांनी सांगितले. 


सरकारने मदत नाही दिल्यास राज्यपालांना भेटणार

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील, खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. झालेल्या नुकसानीचे सरकारकडून त्वरीत पंचनामे करण्याची मागणी करून नुकसान भरपाई द्यावी. सरकारने नाही ऐकल्यास राज्यपालांना आपण भेटू असे पत्रकारांशी बोलताना खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी सांगितले. 


 
Top