धाराशिव लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ तामलवाडी येथे घेण्यात आली. या प्रचार सभेतून बोलत असताना अमित देशमुख यांनी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी सरकार अंगावर घेतले. पण सर्वसामान्य साथ सोडली नाही असे गौरव उद्गार काढले. 

या समयी बोलत असताना त्यांनी महायुतीच्या सरकारवर कडाडून टीका केली. हे करत असताना त्यांनी अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनाही चिमटा काढला. महाराष्ट्रात एकदा उपमुख्यमंत्री झाला कि पुन्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला नाही असा एक टोला लगावला. मराठवाड्याच्या हक्काचे 21 टीएमसी पाणी हे विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मंजूर झाले होते. त्यासाठी मधुकर चव्हाण यांनी मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष असताना सातत्याने पाठपुरावा केला. त्याचाच परिणाम म्हणून सात टीएमसी पाणी आज मराठवाड्यात मिळाले आहे. उर्वरित पाणी हे लवकरच धाराशिव जिल्ह्यास मिळणार असून यासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे केंद्राचा निधी खेचून आणतील. तसेच कैलास पाटील हे राज्याचा निधी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतील असे उद्गार काढले. 

मधुकरराव चव्हाण यांनी प्रचारादरम्यान कुटुंब मोठे झाले की अशा छोट्या मोठ्या गोष्टी घडत असतात. असे सांगून मीडियामध्ये माझ्या संदर्भाने खोट्या अफवा उठवलेल्या आहेत. मी अशा खोट्या अफवांना भीत नाही. मी दिलेला शब्द पाळणारा व्यक्ती आहे. 


 
Top