तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ  तुळजापूर शहरासह परिसरास शनिवारी दुपारी मुसळधार अवकाळी पावसाने झोडपुन काढले असून, शहरातील नाल्यामध्ये प्लॉस्टिक व कचरा अडकल्याने पावसाचे पाणी थेट श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये गेले. 

शनिवारी दुपारी साडेतीन वाजता विजेच्या गडगडाट वादळवाऱ्यासह अवकाळी मुसळधार पावसास आरंभ झाला. तो साडेपाच पर्यत मुक्त पणे बरसला. मंदीर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी खोल भागात असल्याने शहरातील पावसाचे पाणी थेट साडेचारच्या सुमारास राजमाता माँ जिजाऊ महाध्दार समोर पाणी जाण्यासाठी असणाऱ्या लोखंडी जाळ्यात कचरा प्लास्टिक अडकल्याने महाध्दार समोर पाणी साचले. ते पाणी राजमाता माँ जिजाऊ महाध्दारच्या पायऱ्या वरुन गोमुख तिर्थ कुंडाजवळील पायऱ्या वरुन गेले. ते थेट निंबाळकर दरवाजातुन होमकुंडा समोर जावु लागताच तात्काळ मंदीरच्या कर्मचाऱ्यांनी निंबाळकर दरवाजा समोर पाणी जाणारी लोखंडी जाळी काढल्याने त्यातुन मोठ्या प्रमाणात पाणी गेल्यामुळे मंदिरात जाणारा पाणी प्रवाह कमी झाला. तरीही निंबाळकर दरवाजातुन जाणारे पाणी दर्शन मंडप समोर असलेल्या बंदीस्त नाली खाली गेल्याने पाणी प्रदक्षणा मार्गावर थांबले नाही. या वाहत्या पाण्यातुन भाविकांना मंदिरात दर्शनार्थ  जावे लागले. तुळजापूर तालुक्यात सर्वदूर पाऊस पडला या पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले.


 
Top