कळंब (प्रतिनिधी)- कळंब तालुका ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने  दिनांक 12 एप्रिल रोजी डॉ .जाधवर हॉस्पिटल कळंब येथे ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात कळंब येथील वैद्यकीय  व परमार्थिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान असणारे जाधवर कुटुंबातील  सौ. महानंदा लक्ष्मणराव जाधवर यांचा नुकताच राष्ट्रमाता जिजाऊ संस्थेच्या वतीने आदर्श माता हा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या कळंब तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती तसेच जिल्हा मुख्याध्यापक संघाचा ज्ञानभाषा गौरव पुरस्कार सन्मानपत्र, फेटा, शाल, पुष्पहार देऊन साहित्यिक सोपान पवार यांचा कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ  प्रमुख पाहुणे अन्नदाते बंडोपंत दशरथ ज्येष्ठ नागरिक महासंघाचे मराठवाडा प्रदेश सचिव डी .के. कुलकर्णी प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. लक्ष्मणराव जाधवर डॉ. माणिकराव डिकले यांच्या उपस्थितीत  फेटा, शाल व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. 

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी महानंदा जाधवर यांनी पती डॉ. लक्ष्मणराव जाधवर यांना खंबीर साथ देत मुलांना योग्य संस्कार व शिक्षण दिले यामुळे कुटुंबातील तिन्ही मुले नेत्ररोग तज्ञ डॉ. अभिजीत जाधवर, हृदयरोग तज्ञ डॉ. अविनाश जाधवर व इंजिनीयर बाळासाहेब जाधवर उच्चशिक्षित आहे त्याचबरोबर जाधवर कुटुंबीय रुग्णसेवे बरोबर श्रीक्षेत्र चाकरवाडी ज्ञानेश्वर माऊली यांचे भक्त म्हणून परमार्थिक क्षेत्रातही कार्य करत आहे या आदर्श कुटुंबातील आदर्श माता हा महानंदा जाधवर यांचा बहुमान झाला आहे याबद्दल आनंद व्यक्त केला व त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रात नव उपक्रमशील शिक्षक तसेच साहित्य क्षेत्रात आपले लेखनी द्वारे ठसा उमटविणारे सोपान पवार यांच्या कार्याचा गौरव केला कार्यक्रमात डी .के .कुलकर्णी,  विधीज्ञ त्रिंबकराव मनगिरे ,सामाजिक कार्यकर्ते विलासराव करंजकर ,जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश टेकाळे ,रोटरी परिवारातील संजय देवडा, राष्ट्रमाता जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष परमेश्वर पालकर, पत्रकार माधवसिंग राजपूत, प्रदीप यादव सहशिक्षक रमेश शिंदे, सत्कारमूर्ती साहित्यिक सोपान पवार यांनी मनोगते व्यक्त केली  या कार्यक्रमासाठी जैन समाज संघटनेचे अध्यक्ष बाबू शेठ लोढा, प्रा.जाधवर, बब्रुवान पांचाळ, नाना चौधरी ,विमा प्रतिनिधी युवराज मुरकुटे ,रोटरी परिवारातील रवी नारकर, डॉ, सचिन पवार, धर्मेंद्र शहा, डॉ. गिरीष कुलकर्णी, डॉ. लोंढे, सामाजिक कार्यकर्ते बंडू ताटे मंजुषा पवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन डी. के. कुलकर्णी यांनी व आभार डॉ. अभिजीत जाधवर यांनी मानले. पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.


 
Top