धाराशिव (प्रतिनिधी) - इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींची फीस न भरल्यामुळे शालेय व्यवस्थापनाने त्या विद्यार्थिनींना परीक्षेपासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान तर झालेच. शिवाय शारीरिक व मानसिक त्रास दिला आहे. याप्रकरणी अभिनव इंग्लिश स्कूल या शाळेवर कारवाई करावी अशी मागणी संबंधित विद्यार्थ्यांनींच्या पालकांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे दि.5 एप्रिल रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, संतोष क्षीरसागर यांची मुलगी ज्ञानेश्वरी (वय 11 वर्षे) व रविकांत शेषराव बांगर यांची मुलगी नंदिनी (वय 11 वर्षे) या दोघीजणी अभिनय इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता 6 वी या वर्गात शिकत आहेत. सध्या त्या विद्यार्थ्यांनींचे वर्षिक परीक्षेचे पेपर चालु आहेत. पालक क्षीरसागर व बांगर यांच्या काही घरगुती अडचणीमुळे मुलींच्या शाळेची फिस भरण्यासाठी त्यांना विलंब झाला. त्यामुळे अभिनव इंग्लिश स्कूलचे मुख्यध्यापक मोदानी व श्रीमती मोदानी यांनी त्यांच्या मुलींना वार्षिक परीक्षेला बसु दिले नाही व त्यांना वार्षिक परीक्षाचा पेपर न देता दि.4 एप्रिल रोजी व पुर्वी वारंवार टेबलवर तसेच उन्हामध्ये उभे करून त्यांना मानसिक व शारीरीक त्रास देवून लहान मुलांच्या मनावर परीणाम होईल अशी अतिशय वाईट वागणुक देवुन त्यांचे शैक्षणिक नुकसान केले आहे. याबाबत पालक क्षीरसागर व बांगर यांनी विचारण्यासाठी दि.4 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास गेल्यानंतर त्यांना अरेरावीच्या भाषेत बोलून शिवीगाळ करून तुम्हाला काय करायचे ते करा ? माझे कोणी काही वाकड करू शकत नाही. तुम्हाला कुठल्या पेपरला बातमी द्यायची ती द्या तसेच तुमच्या बापाची पेंन्ड आहे काय ? तुम्ही आधी फिस भरा व नंतर बोला. नाहीतर मी तुमच्या मुलींना परीक्षाला बसू देणार नाही. त्यांना पेपर देणार नाही असेच ऊनात उभे करणार आहे असे म्हणत त्यांना धमकी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून अभिनव इंग्लिश स्कूलचे मुख्यध्यापक मोदानी व श्रीमती मोदानी यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.


 
Top