तेर (प्रतिनिधी) - धाराशिव तालुक्यातील तेर येथील सुभाष मदने यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभागाच्या पथकाने सुखरूप बाहेर काढले.

धाराशिव तालुक्यातील तेर येथील सुभाष रामभाऊ मदने यांच्या शेतातील विहिरीत 25 एप्रिलला कोल्हा दुपारी पडलेला आढळून आला. वन विभागास संपर्क केला परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही.26 एप्रिलला संध्याकाळी वनविभागाच्या पथकाने  विहिरीत पडलेल्या कोल्हाला सुखरूप बाहेर काढले.याकामी वन परीक्षेत्र अधिकारी बी.ऐ.चौगुले, वनपाल आर.एम.शिंदे, वनरक्षक एस.बी.सुतार, एम.ऐ.माने, एस.एस.साळूंके, वनकर्मचारी नितीन खांडेकर, यूसूफ काझी, बालाजी जाधव, मुबारक खोंडे, नागेश मगर यांनी परिश्रम घेतले.


 
Top