धाराशिव (प्रतिनिधी)- शाहूराज घोगरे व त्यांच्या परिवाराने आजच्या दुष्काळाच्या दाहकतेत धाराशिव शहरातील गरजू भागात पावसाळा सुरू होईपर्यंत टँकरने मोफत पाणीपुरवठा करण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. असे मत राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य उमाकांत मिटकर यांनी व्यक्त केले.

शाहूराज खोगरे हे भोसले हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक आहेत. त्यांचा मुलगा डॉ.रविराज खोगरे हे मुंबई येथे इन्कम टॅक्स कमिशनर तर सुन डॉ.चेतना खोगरे या सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतात. संत गोरोबाकाका नगर, सांजा येथे झालेल्या कार्यक्रमात विशेष अतिथी राष्ट्रीय कर्तव्य अभियानाचे विजय वरूडकर, सामाजिक कार्यकर्ते सुधिर बिक्कड,विस्तार अधिकारी संजय ढाकने, ग्रामसेवक एकनाथ माने, अशोक बांगर, संतोष लाटे, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे नियोजन सामाजिक कार्यकर्ते सुजित साळुंके यांनी केले. खोगरे कुटूंबाच्या सौजन्याने सुरू केलेल्या मोफत पाणी पुरवठ्यामुळे नागरिकात आनंदाचे वातावरण आहे. 
Top