धाराशिव (प्रतिनिधी)- रोटरी क्लब उस्मानाबाद, रोटरी डिस्ट्रिक्ट 3132, व कालिका स्टील यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव जिल्ह्यातील 22 जिल्हा परिषद शाळांना पुस्तके व ग्रंथालय कपाटे प्रदान करण्यात आली.

डिस्ट्रिक्ट 3132 च्या प्रोजेक्ट विद्या अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमा अंतर्गत प्रत्येक शाळेला एक ग्रंथालय कपाटे व शालेय विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी 30 पुस्तके देण्यात आली. या प्रकल्पासाठी रोटेरियन अभिजीत पवार, डायरेक्टर एज्युकेशन ॲन्ड लिटरसी, रो. कुणाल गांधी व रोटरी नेत्र रुग्णालयाचे शिवरूद्र ईसाके यांनी विशेष परिश्रम घेतले.


 
Top