तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील शेतकरी अनिल युवराज टेळे यांच्या शेतात लागवड केलेल्या व काढणीस आलेल्या कलिंगड पिक  अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे जवळपास 3 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

 तेर व परिसरात 20 एप्रिलपासून वादळी वारे मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले कलिंगडाचे पीक निसर्गाच्या कोपामुळे शेतकऱ्यांच्या हातातून निसटले आहे.अनिल टेळे यांनी आपल्या दिड  एकर शेतात दीड लाख रूपये खर्चून कलिंगडची  28 फेब्रुवारी 2024 रोजी लागवड केली होती.परंतु 20 एप्रिलपासून दिवसापासून सतत पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे कलिंगडाचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी कलिंगड नासून जात असल्याने शेतकऱ्यांचे जवळपास 3 लाख  रुपयांचे नुकसान झाले.


 
Top