परंडा (प्रतिनिधी) - महात्मा फुले यांचे विचार समाजाला दिशा देणारे आहेत असे प्रतिपादन डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले. 

क्रांतीसुर्य सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गुरुवार दि 11 रोजी आयोजित करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणन पोलीस निरीक्षक इज्जपवार, बि.डि.शिंदे, माजी प्राचार्य चंद्रकांत घुमरे, गोरख मोरजकर, भाऊसाहेब खरसडे, नसीर शहाबर्फीवाले, उमाकांत गोरे, शिवाजी येवारे, नंदकुमार शिंदे, श्रीहरी नाईकवाडी, पत्रकार सुरेश घाडगे, उमेश सोनवणे, गंप्पू साडेकर आदि उपस्थित होते.

सर्व प्रथम क्रांतीसुर्य सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस धूप दीप प्रज्वलित करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी आपले वरिल मनोगत व्यक्त केले. या वेळी प्रा.विलास गायकवाड,धनंजय सोनटक्के, तानाजी जाधव, किरण बनसोडे, चंद्रहास बनसोडे, गणेश सरवदे, महावीर बनसोडे, रणधीर मिसाळ, मधुकर सुरवसे, प्रदिप परीहार, किरन गायकवाड, विविध सामाजिक संघटना मध्ये कार्य करणारे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.


 
Top