धाराशिव (प्रतिनिधी)-कळंब, वाशी तालुक्यात दरोडा व लुटीच्या गुन्ह्यातील आरोपीस पोलिसांनी जेरबंद केले आहे. 

दि. 11.04.2024 रोजी पोलिस पथकास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, दरोडा व लुटीच्या गुन्ह्यातील आरोपी अमोल नाना काळे रा. कन्हेरवाडी पाटी यांने व त्याचे साथीदार यांनी गुन्हा केला आहे. सध्या एका झाडाखाली लपून बसला आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पथकाने लगलीच कन्हेरवाडी येथे जावून आरोपीचा शोध घेतला. त्यावेळी त्यांने त्याचे नाव अमोल नाना काळे, वय 23 वर्षे रा. कन्हेरवाडी पाटी असे सागिंतले व  त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली. त्यांनी प्रथमत: पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेउन विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले की, मी व माझे चार साथीदार यांनी  मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यावर विशेष पथकाने आरोपी अमोल नाना काळे, वय 23 वर्षे, राहुल कालीदास काळे, वय 22 वर्षे, अतुल कालीदास काळे तिघे रा. कन्हेरवाडी पाटी ता. कळंब जि. धाराशिव यांना ताब्यात घेवून त्यांचे कडून गुन्ह्यात चोरीस गेलेली रोख रक्कम, दोन गॅस टाक्या,मोटरसायकल, 60 लिटर डिझेल असा एकुण 81 हजार 80 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून माल हस्तगत करुन नमुद तीन आरोपीस चोरीच्या मालासह कळंब पोलिसांच्या ताब्यात दिले.

सदरची कामगीरी  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व गौहर हसन. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक  अमोल मोरे, सचिन खटके, पोहेकॉ विनोद जानराव, समाधान वाघमारे, अमोल निंबाळकर, हुसेन सय्यद, पोलीस नाईक नितीन जाधवर, बबन जाधवर,  पोलीस अमंलदार रविद्रं आरसेवाड, मपोहकॉ शोभा बांगर, शैला टेळे  यांच्या पथकाने केली आहे.


 
Top