कळंब (प्रतिनिधी)-शहरातील बस स्थानकात पहिल्याच अवकाळी पावसात गुडघाभर पाणी साचले तर या पाण्याच्या पाण्यात अख्ख्या कळंबची घाण सर्व बस स्थानकात पसरल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.

बस स्थानकात गुडघाभर पाणी साचल्यामुळे प्रवाशांना आत बाहेर जाणे येण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. या घाणीमुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे. या दुर्गंधीमुळे रोगराई पसरण्याची भीती प्रवाशातून व्यक्त केली जात आहे. बस स्थानकातील घाण नगर परिषदेने तातडीने स्वच्छ करावी अशी मागणी प्रवाशातून जोर धरत आहे.  याकडे मात्र रा.प. प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.  बस स्थानकात सांडपाणी व नाल्याच्या पाण्यामुळे बस स्थानकाची पूर्ती वाट लागली आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्यामुळे गावातील घाण बस स्थानकात आल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.  याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देण्याची गरज आहे. शहरातील नाल्याचे पाणी बस स्थानकात येत असल्यामुळे नगर परिषदेने हे पाणी तातडीने बंद करावे अन्यथा प्रवासी मित्र संघटना नगर परिषदेसमोर तीव्र आंदोलन करील असा इशारा प्रवासी मित्र संघटनेने यावेळी बोलताना दिला आहे.  


 
Top