धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी कार्यालयातील परिसरात 100 टकके मतदान व्हावे व मतदानाचा टक्का वाढवा म्हणून जिल्हा निवडणूक विभाग स्वीप अतंर्गत नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी माध्यमिक श्रीमती सुधा साळुंके यांच्या संकल्पना मार्गदर्शनात स्काऊट गाईड कार्यालयात दि. 22 रोजी आयोजित पोस्टर कार्यशाळेत  जिल्ह्यातील 23 कलाध्यापकांनी साकारलेल्या 35 पोस्टर्स प्रदर्शित केली होती. त्यांचे उद्घाटन जिल्हा मुख्य निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जि.प. मुख्याधिकारी डॉ. मैनक घोष यांचे हस्ते करण्यात आले. त्यानंतर सर्व पोस्टर्स ची पाहणी केली. या प्रसंगी शिक्षणाधिकारी माध्यमिक श्रीमती सुधा साळुंके, शिक्षणाधिकारी प्राथमिक अशोक पाटील उपशिक्षणाधिकारी फाटक विस्तार अधिकारी टी. एफ. काझी, पोस्टर कार्यशाळा प्रमुख तथा जिल्हा कलाध्यापक संघ जिल्हासचिव शेषनाथ केशरबाई दगडोबा वाघ, विस्तारअधिकारी बालाजी यमुरवाड, भारत देवगुडे, श्री जंगम, केंद्रप्रमुख निलेश नागले, मुख्याध्यापक, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.


 
Top