धाराशिव (प्रतिनिधी)- मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ केली असुन त्या शेतकऱ्यांनी त्यांना पुन्हा मतदान करावे अस एक तरी काम सांगावे असे अवाहन आमदार कैलास पाटील यानी मतदारांना केले आहे. ते नायगाव (ता.कळंब) येथील प्रचारसभेत बोलत होते.

यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय दुधगावकर, तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, दिलीप पाटील, रणजित बागल, बाळासाहेब माकोडे, लिंबराज शितोळे, सुधाकर शितोळे, बालासाहेब शितोळे, व्यंकट माळी,अजय समुद्रे, हनुमंत पाटील, शरद टेकाळे, नासेर पठाण, बी.एन. डोंगरे, बाळासाहेब बोंदर, गौतम ओवाळ, केशव शितोळे, रामलिंग साकळे, उद्धव शितोळे, विष्णू बापू लामतुरे, राजाभाऊ शितोळे, सत्तार मिनीयार,ऋषी गडकर,विजय वाघे,शंभू बिडवे,दत्ता आव्हाड,नारायण गुंड,बाळासाहेब गुंड,सुरज टेकाळे, बाळासाहेब सरवदे उपस्थित होते.

यावेळी पाटील म्हणाले की, दहा वर्षापुर्वी जे शेतमालाचे दर होते तेच आजही आहेत. दुसऱ्या बाजुला उत्पादनाचा खर्च हा दुपट्टीहुन अधिक पट्टीने वाढला आहे. शेतकरी नैसर्गिक आपत्तीना तोंड देताना त्याला सर्वाधिक त्रास महागाईचा बसत आहे. जीएसटीने तर शेतकऱ्यांची लुटच होत आहे.खते व शेतीच्या विविध साधनावरील वस्तुवर जिजया करातच शेतकऱी होरपळुन जात असल्याचे आमदार पाटील म्हणाले.


 
Top