धाराशिव (प्रतिनिधी)- मोबदला म्हणून रोख स्वरुपात किंवा वस्तु स्वरुपात किंमत देऊन कोणत्याही प्रसार माध्यमात ( मुद्रण व इलेक्ट्रॉनिक) प्रसिध्द होणारी कोणतीही बातमी किंवा विश्लेषण ' अशी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने पेडन्यूजची व्याख्या केली आहे. ही व्याख्या भारत निवडणूक आयोगाने सर्वसाधारणपणे स्वीकारली आहे.लोकसभा निवडणूक कालावधीत जिल्ह्यात प्रकाशित व प्रसारीत होणा-या पेडन्यूजवर माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीचे (एम.सी.एम.सी.) लक्ष राहणार आहे.

निवडणूक कालावधीत माध्यमात प्रकाशित/ प्रसारित होणारे वृत्त ही उमेदवाराच्या बाजूने काही मोबदला घेऊन प्रसारित करण्यात येत असल्याची शंका समितीला आल्यास अथवा कोणी तशी समितीकडे तक्रार केल्यास त्या वृत्तासंबंधी संबंधित उमेदवाराला नोटिसीव्दारे एम.सी.एम.सी समिती खुलाशाची विचारणा करू शकते.जर समितीला संबंधितांचा खुलासा मान्य झाल्यास त्यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही.मात्र समितीला त्याबाबत खुलासा मान्य न झाल्यास संबंधित वृत्त हे पेड न्यूज आहे,असे गृहीत धरून तो खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट केला जातो.


 
Top