भूम (प्रतिनिधी)-शिवसेनेचे धनंजय सावंत यांना उमेदवारी डावल्याने वाशी तालुक्यातील शिवसैनिक आक्रमक झालेले असून तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे वरिष्ठ पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द करून शिवसेना प्राथामिक सदस्य नोंदणीच्या फॉर्मची होळी करून निषेध करण्यात आला आहे.

धाराशिव लोकसभेसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी शिवसेनेला डावलून महायुती मधील वरिष्ठ नेत्यांनी शिवसेनेचे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांना उमेदवारी डावलली. भाजपमधून नुकत्याच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या अर्चनाताई पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेल्या वाशी तालुक्यातील शिवसैनिकांनी दि. 6 एप्रिल रोजी येथील भैरवनाथ शुगर वर्कस येथे बैठक घेवून, महायुतीतील सर्व पदाधिकाऱ्यांचा निषेध करून तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदाचा राजीनामा देऊन शिवसेनेच्या प्राथमिक सदस्य नोंदणीच्या जवळपास दोन हजार फॉर्मची होळी करण्यात आली. तसेच झालेल्या बैठकीमध्ये सर्व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भावना व्यक्त करत महायुती सरकारमधील वरिष्ठ नेत्यांनी अजूनही वेळ न घालवता सदरची जागा शिवसेनेला सोडावी किंवा उमेदवार बदलून विजयी होणारा उमेदवाराला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. तसेच भविष्यात जर महायुतीचा उमेदवार पराभूत झाला तर याला याला धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिक जबाबदार असणार नाहीत. अशी भावना तालुक्यातील पदाधिकारी यांनी व्यक्त केली.

या  बैठकीला शिवसेना वाशी तालुकाप्रमुख सत्यवान गपाट, युवासेनेचे युवा जिल्हाध्बायक्ष क्षमा ळासाहेब मांगले, माजी नगराध्यक्ष नागनाथ नायकवाडी, उपतालुकाप्रमुख विकास तळेकर, वाशी शहरप्रमुख सतिष शेरकर,  युवा सेना तालुकाप्रमुख प्रवीण गायकवाड, उपतालुकाप्रमुख स्वप्निल कोकाटे, सुनील मोरे, रंजीत घुले, नितीन रणदिवे, अतुल चौधरी, अशोक लाखे, उद्धव साळवी यांच्यासह तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top