तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिव  लोकसभेच्या रणांगणात महाविकास आघाडीचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर विरुध्दात महायुतीचा उमेदवार  कोन असणार. जागा कुणाला जाणार हे स्पष्ट होत नसल्यामुळे  उस्मानाबाद  मतदारसंघात महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर विरोधात कोणत्या पक्षाच्या कोण उमेदवार असणार याची उत्सुकता प्रचंड वाढली आहे.

महायुतीला महाविकासआघाडी उमेदवार खासदार ओम राजेनिंबाळकर विरोधात कोण हे  ठरवता आलेले नाही. याला कारण भाजप पक्षाने दोन्ही प्रकारच्या  केलेल्या सर्वैक्षणात महाविकास आघाडी उमेदवारास पराभुत सापडत नसल्याने महायुतीस उमेदवार निश्चित करणे कठीन बनले आहे. त्यात धाराशिव जागा भाजपसाठी प्रतिष्ठेची असल्याने  व प्रथमच भाजप उमेदवार कमळ चिन्हावार लढणार असल्याने भाजप उमेदवारा बाबतीत प्रचंड दक्ष ता घेत आहे.

ही  जागा जिंकायचीच या हेतूने भाजप रणनीती ठरवत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (ठाकरे गट) म्हणजेच महाआघाडीच्या उमेदवाराच्या तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या  लोकसभा मतदारसंघासाठी यापूर्वी महायुतीकडून अनेक नावे चर्चेत आली होती. या प्रत्येक

उमेदवारासाठी स्वतंत्र सव्हें करून त्यांची व्होट बँक तपासण्यात आली पण सर्वे समाधानकारक येत नसल्याचे दिसुन आल्याचे समजते. त्यामुळे महाविकास आघाडी उमेदवार खासदार ओम राजेनिंबाळकर  यांच्यासमोर कोण आव्हान उभे करतील की नाही, याबाबत सर्व्हेच्या निष्कर्षावरून भाजपमध्ये साशंकता दिसते. त्यामुळेच ऐन उन्हाळ्यात महायुतीत धाराशिव जागेवरुन भाजपचा  राजकीय पारा टोकावर आहे. खा. राजेनिंबाळकर  यांना पर्याय द्यायचा ठरला. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडुन निवडणुक लढवुन पराभुत झालेले व विधानसभा निवडणुकीत भाजपकडुन निवडुन आलेले आमदार  राणाजगजितसिंह पाटील  यांचे नाव सध्या  चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. 

सध्या उस्मानाबाद जागा लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे जाण्याची शक्यता असल्याने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडुन ही जागा लढवावी या बाबतीत चर्च सुरु आहे. या जागेबाबतीत  सध्यातरी कसलीही रिस्क घ्यायला भाजप तयार नाही.  त्यामुळे त्यांच्यासमोर महायुतीचा कोणता उमेदवार टिकेल. याची चाचपणी पूर्ण झाल्यानंतर उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघाबाबत लवकरच निर्णय अनपेक्षित असेल, अशीथेट चर्चा आहे.


 
Top