भूम (प्रतिनिधी)-देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिर एक बार पंतप्रधान करण्यासाठी धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सौ अर्चनाताई पाटील या राष्ट्रवादीच्या असल्या तरी त्यांना मताधिक्य मिळवून देण्याची जबाबदारी भूम तालुका भारतीय जनता पार्टीने घेतली आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक गावात कॉर्नर सभेचा तडका सुरू झाला आहे. 3  दिवसात 13 गावात 22 कॉर्नर सहभाग घेतल्या आहेत. या सभेतून मोठा प्रतिसाद मिळत आहे.      

यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चनाताई पाटील या राष्ट्रवादी कॉग्रेस घडयाळ चिन्हाच्या उमेदवारा असल्या तरी कमळ चिन्हाच्या उमेदवार आहेत असे गृहीत धरून भाजपची टीम आंग मेहनतीने रणनीती आखत आहे. नियोजन करत आहे. साचेबद्ध पद्धतीने मतदान करून घेण्याच्या वेळेपर्यंत नियोजन केल आहे. त्याचाच हा एक भाग म्हणून तालुक्यातील 91 गावांमध्ये कॉर्नर सहभाग घेण्यासाठी 21 प्रमुख वक्त्यांची निवड केली आहे. त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे.

त्याप्रमाणे जबाबदारी दिलेल्या गावात जाऊन त्या ठिकाणचे एकनाथ शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी, महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी, आरपीआय आठवले गटाचे पदाधिकारी,  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी बरोबर घेऊन कॉर्नर सभा घेताना दिसत आहे. 

कॉर्नर सभेसाठी भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकुर, परंडा विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली भूम तालुक्यात तालुका अध्यक्ष महादेव वडेकर, तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर, बालाजी बांगर, जिल्हा उपाध्यक्ष सुदाम पाटील,  ज्येष्ठ नेते काकासाहेब चव्हाण,  जालिंदर मोहिते, चंद्रकांत मासाळ,  राजसिंह पांडे, तालुका उपाध्यक्ष हेमंत देशमुख, तालुका प्रसिद्धी प्रमुख शंकर खामकर, अनुसूचित जाती जमाती तालुकाध्यक्ष प्रदीप साठे, भूम शहराध्यक्ष बाबासाहेब वीर, बाबासाहेब गीते, विधीज्ञ संजय शाळू, उदयोग आघाडी तालुका अध्यक्ष चंद्रकांत गवळी , जनसेवा बॅक संचालक बाबूराव खरात, विधीज्ञ आंगद चव्हाण, शरद चोरमले, संदिप महानवर, मुकुंद वाघमारे, बापू बगाडे, चंद्रकात मासाळ आदींचा सहभाग आहे.


 
Top