तुळजापूर (प्रतिनिधी)-  येथील श्रीतुळजाभवानी मंदीर महाध्दारांसमोर भाविकांना उन्हापासुन बचाव होण्यासाठी मंडप मारला आहे. माञ या मंडपात किरकोळ विक्रते ठाण मांडुन व्यवसाय करीत असुन काही भागात दुचाकी उभ्या केल्या जात आहेत. मंडपात विक्रते व दुचाकी तर भाविक उन्हात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

श्रीतुळजाभवानी मंदिर संस्थानच्यावतीने प्रतिवर्षी उन्हाळ्यात उन्हापासुन संरक्षण होण्यासाठी मंडप उभारला जातो. यंदा ही तो उभारला आहे. माञ दुपार नंतर या मंडपात किरकोळ व फिरते विक्रेते व्यवसाय करीत आहेत. तर काही महाभाग थेट या मंडपात मंदीर प्रवेशध्दारा समोर दुचाकी सावलीत उभ्या करीत आहेत. मंडप हा दुचाकी व किरकोळ विक्रेत्यांनी भरुन जात असुन भाविकांना सोय उपलब्ध असताना भाविकांना उन्हात उभे राहावे लागत आहे. येथील किरकोळ विक्रते सुरक्षारक्षकांना जुमानत नाहीत. काही महिला, पुरुष किरकोळ विक्रेते यांना मंडपातुन बाहेर जाण्यासाठी सांगण्याचा प्रयत्न करताना थेट त्यांच्या अंगावरहा जात आहे. त्यामुळे  मंडप भाविकांसाठी मोकळा करुन देण्याची मागणी होत आहे.


 
Top