परंडा (प्रतिनिधी) - परंडा येथील महात्मा फुले चौकात आज रविवार दि.14 रोजी महामानव प.पुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यी 133 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रतिमा पूजन माजी नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर यांच्या हस्ते करण्यात आले.  

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता आणा साळुंखे, प्रहार जिल्हा अध्यक्ष वर्षेद शिंदे ,समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष बिभिषण खुणे, गवर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर काकासाहेब साळुंखे , शरद पवार गटाचे शहरं अध्यक्ष श्रीहरी नाईकवाडे, नंदू शिंदे, कानिफनाथ सरपंच गोवर्धन शिंदे, कैलास चव्हाण, सुहास पाटील, बाळू गायकवाड, दीपक गायकवाड, खदीर जिनेरी आदी मान्यवर उपस्थित होते. 

जयंती निमित्त कार्यक्रमात गरजू गरीब विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वही, पेन वाटप करून दिवसभर भोजन आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कार्यकारणी सदस्य तानाजी बनसोडे , मंडळाचे अध्यक्ष प्रफुल्ल चौतमहाल, उपाध्यक्ष शिवाजी बनसोडे, संजय बनसोडे, अण्णा बनसोडे, युवराज बनसोडे, आशिष बनसोडे, कुणाल बनसोडे, दादा सरोदे, मंगेश भोसले, प्रमोद पोळ, जितेंद्र सरोदे आदींनी परिश्रम घेतले.


 
Top