तुळजापूर (प्रतिनिधी) -मुंबईचा एके काळचा गाजलेला डॉन अरुणभाई गवळी याची सजा माफ होवुन तो जेलमधुन सुटताच त्यांची पत्नी आशाताई गवळी यांनी थेट तिर्थक्षेञी तुळजापूर येथे मंगळवारी येवुन श्रीतुळजाभवानी मातेस महापुजा करुन नवसपुर्ती केली.

डॉन अरुण गवळी याची सजा माफ होवुन तो जेलमधुन सुटावा यासाठी  त्यांची पत्नी आशाताई गवळी यांनी श्रीतुळजाभवानी मातेस नवस बोलला होता. डॉन अरुण गवळीची सजा माफ होवुन तो जेल मधुन सुटताच त्यांची पत्नी आशाताई अरुन गवळी यांच्या पत्नीने  मंगळवारी थेट तुळजापूर येथे येवुन श्रीतुळजाभवानी मातेस महाअभिषेक पुजा करुन साडीचोळीची पुजा करुन नवसपुर्ती केली. पुनश्च गवळी परिवारावर असे संकटे येवु देवु नको असे साकडे घातले. यापुजेचे पौराहित्या त्यांचे पुजारी वि. ल. रोचकरी यांनी केले.


 
Top