धाराशिव (प्रतिनिधी)- लोकसभा निवडणूक कामात हलगर्जीपणा वरिष्ठ लिपीक व ग्रामसेवकावर महागात पडले. जिल्हाधिकाऱ्यानी दि. 12 एप्रिल रोजी दोघांना निलंबित केले आहे. त्यामुळे अन्य कर्मचाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. 

तुळजापूर तालुका कृषी कार्यालयातील वरिष्ठ लिपीक एस. एस. सोलनकर, तुळजापूर पंचायत समितीचे ग्रामसेवक डी. डी. कांबळे यांना खानापूर येथील चेक पोस्ट येथे नियुक्ती दिली होती. 11 एप्रिल रोजी तुळजापूर उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश देशमुख यांनी चेक पोस्टला भेट दिल्यानंतर ते दोघेही तेथे हजर नव्हते. त्यांनी याबाबत अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिला. कामात हलगर्जीपणा तसेच विनापरवानगी गैरहजर राहून निवडणुकीच्या राष्ट्रीय कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी नमूद दोघांना शुक्रवारी निलंबित केले आहे. या कारवाईमुळे कामात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.


 
Top