तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे मुखमंञी एकनाथ शिंदे यांच्या सुनबाई  वृषालीताई श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवार दि. 12 एप्रिल रोजी तिर्थक्षेञ तुळजापूरला येवुन श्रीतुळजाभवानी मातेची यथासांग पुजा कुलधर्म कुलाचार केला व मनोभावे दर्शन घेतले. यावेळी शिंदे परिवाराचे पुजारी विशाल रोचकरी यांनी त्यांच्या पुजेचे  पौराहित्य केली. यावेळी नंदूकुमार गंगणे, शाम गंगणे, सुरक्षा अधिकारी बाळासाहेब बागल, अजय तिरुपती वाघे  उपस्थीत होते.


 
Top