भूम (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा भूम शहराध्यक्षपदी सुरुची साठे यांची निवड झाली. यावेळी धाराशिव लोकसभा मतदार संघातून उबाठा शिवसेनेच्या उमेदवारांनी आपली अनामत रक्कम वाचवण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष अस्मिताताई कांबळे यांनी भूम येथे बोलताना केले.
शनिवार दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष अस्मिताताई कांबळे यांनी धाराशिव लोकसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भाजप, शिंदे शिवसेना गट व मित्र पक्षाच्या उमेदवार अर्चनाताई राणाजगजीतसिंह पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने भूम तालुक्यात भेट देऊन ठिकठिकाणी बैठका घेतल्या. उमेदवाराचे ओळख परिचय पत्र घरोघरी पोहोचण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान भूम येथे झालेल्या बैठकीत सुरुची साठे यांची भूम शहर भाजपा महिला मोर्चा शहर अध्यक्षपदी निवड करून त्यांचा सत्कार केला.
या दरम्यान त्यांनी चौफेर धाराशिव लोकसभा मतदार संघात तसेच विधानसभा मतदारसंघ निहाय केलेला दौरा, केलेल्या भेटीगाठी, मिळत असलेला प्रतिसाद, या शिवाय 19 एप्रिल 2024 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करताना पदाधिकारी, मतदारांचा मिळालेला प्रतिसाद विचारात घेता किमान तीन लाखाच्या फरकाने अर्चनाताई पाटील यांचा विजय होणार आहे असा विश्वास देखील अस्मिताताई कांबळे यांनी व्यक्त केला.
यावेळी विधानसभा प्रमुख बाळासाहेब क्षिरसागर, जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, जालिंदर मोहिते वालवड, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुदाम पाटील माणकेश्वर, तालुका अध्यक्ष महादेव वडेकर, तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर, उपाध्यक्ष हेमंत देशमुख, कामगार मोर्चा भूम तालुका अध्यक्ष सचिन बारगजे, भूम शहराध्यक्ष बाबासाहेब बीर, बाजार समिती संचालक अंगद मुरूमकर, तालुका प्रसिद्धी प्रमुख शंकर खामकर, अ ज तालुका अध्यक्ष प्रदीप साठे, ग्रा प ईडा सदस्य लक्ष्मण भोरे, युवक तालुका अध्यक्ष गणेश भोगिल, सुब्राव शिंदे वाल्हा, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सौ लता गोरे हिवर्डा, माया गायकवाड, सौ अश्विनी साठे, माजी पंचायत समिती उपसभापती काकासाहेब चव्हाण, राजसिंह पांडे, बाबुराव खरात, मारुती चोबे, संतोष अवताडे, चंद्रकांत मासाळ आदिंची उपस्थिती होती.