धाराशिव (प्रतिनिधी)-कळंब पोलीस ठाणेच्या प्रभारी पोलीस निरीक्षक रवि सानप यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, पोलीस ठाणे कळंब येथील पाहीजे आरोपी हा त्याचे गावी आहे. अशी माहिती मिळाल्यावरुन पोलीस ठाणे कळंब येथील पथकाने लागलीच त्याठिकाणी जावून आरोपी सुर्यकांत रामकिसन गंगणे वय 43 वर्षे, रा. कुत्तरविहीर अंबाजोगाई जि. बीड  यास गुन्हा घडल्यापासून तब्बल 13 वर्षाने दि. 11.04.2024 रोजी अथक प्रयत्न करुन मोठ्या शिथापिने ताब्यात घेतले. 

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व गौहर हसन, उपविभागीय पोलीस अधीकारी संजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली  कळंब पोलीस ठाणेच्या प्रभारी पोलीस निरीक्षक रवि सानप, पोलीस उप निरीक्षक रामचंद्र बहुरे, पोलीस नाईक दत्तात्रय शिंदे, शिवाजी राउत, अभिजीत देशमुख यांच्या पथकाने केली आहे.


 
Top