तुळजापूर (प्रतिनिधी)-शहरात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीच्या निमीत्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 133 रक्तदात्यांनी रक्तदान करून आंबेडकरांना अभिवादन केले. यामध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास आयोजक युवक कार्यकर्ते सागर कदम यांच्या वतीने भारताचे संविधान, पाण्याचा जार भेट देण्यात आला. तसेच रक्तदात्यास अल्पोपाहार देऊन फेटा बांधुन स्वागत केले. यावेळी अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भीम सैनिकांना थंड पाण्याच्या जारची पाणपोई करून देण्यात आली होती.
यावेळी माजी नगरसेवक राहूल खपले,राष्ट्रवादी शहरकार्याध्यक्ष महेश चोपदार यांनी तसेच शहर व तालुक्यातील सर्व जातीधर्मातील नागरिकांनी रक्तदान करून अभिवादन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कीरण कदम,आप्पा कदम, नंदकुमार कदम, बंडू कांबळे, अक्षय कदम,चेतन कदम,विनोद भालेकर, अनुज कदम, गोकुळ कदम, राहुल सोनवणे, कमलेश कदम, नागेश कदम, अनिकेत सोनवणे,अमित कदम, दिपक कदम,औदू सोनवणे लक्ष्मण कदम,कुणाल रोंगे विकास कदम, रोहीत कदम, अजित सोनवणे, सुधीर सोनवणे, सुहास कदम,आदित्य कदम आदिंनी परीक्षम घेतले.