धाराशिव (प्रतिनिधी)- येथील नूतन प्राथमिक विद्यामंदीर मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची  जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रशालेतील सहशिक्षक रमेश वागतकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती उपस्थित शिक्षक व विद्यार्थी यांना दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक प्रदिपकुमार गोरे हे होते. तर प्रमुख उपस्थितीतामध्ये संजय जाधव, श्रीमती शितल उटगे, श्रीमती सारीका उमरकर, श्रीमती अपर्णा देशमुख, श्रीमती दिपाली राऊत, श्रीमती उषा मिसाळ, श्रीमती अर्चना विभुते, श्रीमती जानकी गोरे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शितल देशमुख यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्रीमती तृप्ती तिकोणे यांनी केले.


 
Top