तुळजापूर (प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीचा  प्रचार जोरात सुरु असताना महायुती पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस  पार्टीचा  एक प्रबळ निष्ठावंत गट प्रचारात सक्रिय दिसत नसल्याने महायुतीतील गटबाजी उमेदवार जाहीर झाल्यानंतर ही जैसे थे असल्याचे दिसुन येत आहे.

महाविकास आघाडीकडुन विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर होवुन त्यांची प्रचाराची एक फेरी पण पुर्ण  केली आहे. तर या  नंतर अनेक राजकिय घडामोडी घडल्यानंतर भाजप आमदार राणा जगजितसिंहजी पाटील यांच्या सौभाग्यवती  अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडुन उमेदवारी जाहीर झाली. याचे स्वागत भाजप कार्यकत्यांनी मोठ्या प्रमाणात केले. पण ज्या  दस्तुरखुद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निष्ठावंत गट नाराज झाला. या बरोबरच  शिवसेना गटाने या उमेदवारीचे स्वागत न करता विरोध करुन शिवसेनाला उमेदवारी मिळण्यासाठी मुंबई मुखमंञी दारी धाव घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निष्ठावंत गट, शिवसेना शिंदे गट उमेदवार स्वागत रँली नंतर  प्रचारात मनापासुन दिसले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक गट माञ प्रथमपासुन सक्रिय दिसला. त्यामुळे महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा होत आहे. यामुळे ही गटबाजी दूर करुन महायुती उमेदवारांना एकसंघ करुन प्रचारात सक्रिय करणे महायुतीसाठी आवाहन असणार आहे. नाराज गटाची नाराजी दूर होती की शेवटपर्यत तशीच राहते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पण महायुती तील नाराजी माञ उमेदवाराची मोठी डोकेदुखी  ठरणार यात वाद नाही.


 
Top