धाराशिव (प्रतिनिधी)- 40-उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 85 वर्षापेक्षा जास्त वयस्क मतदार व दिव्यांग मतदार यांचे 1 मे 2024 ते 5 मे 2024 या कालावधीत गृहभेट पोस्टल मतपत्रिका मतदान घेण्यात येणार आहे.त्यासाठी विशेष गृहभेट पोस्टल मतपत्रिका मतदान पथकांची स्थापना करण्यात येत आहे.

12 एप्रिल 2024 ते 17 एप्रिल 2024 या कालावधीत 85 वर्षापेक्षा जास्त असणारे वयस्क असलेले मतदार  व दिव्यांग मतदार यांचेकडून नमुना 12-ड भरुन घेण्यासाठी सर्व केंद्रस्तरीय अधिकारी यांचेमार्फत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सर्व गावातील केंद्रास्तरीय यांना दर दिवशी गावात उपस्थित राहून वय वर्षे 85 पेक्षा जास्त असणारे वयस्क मतदार  (AVSC) व दिव्यांग मतदार (AVPD/PWD) यांचेकडून विहित नमुन्यातील नमुना 12-ड भरून घेण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. 12 एप्रिल 2024 ते 17 एप्रिल 2024 या कालावधीत वय वर्षे 85 पेक्षा जास्त असणारे वयस्क मतदार व दिव्यांग मतदार अशा संवर्गातील सर्व मतदारांनी संबंधित गावातील केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे विहित नमुन्यातील नमुना 12-ड भरून द्यावे.असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे.


 
Top