धाराशिव (प्रतिनिधी)-शहरातील प्रभाक क्रमांक 4 मधील शाहूनगर येथील हनुमान मंदिराच्या संरक्षक भिंतीच्या कामाचे उदघाटन धाराशिव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदुभैय्या राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रयि आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या स्थानिक आमदार निधीतून हे काम पूर्णत्त्वास जात आहे. याबद्दल शिवसेनेचे शहर संघटक प्रशांत (बापू साळुंके यांनी आमदार कैलास घाडगे पाटील यांचे आभार व्यक्त केले.

 यावेळी  जाधव, पाणबुडे, कांबळे, गुंडरे, पडवळ,  बाजुळगे, सलगर,  निलेश फुगारे, विकास जाधव,  इंगळे, भाऊ जाधव, पिंटू डवकरे,  पवार,  महेश पडवळ यांच्यासह या भागांतील हनुमान भक्त नागरिक उपस्थित होते. या कामाला सुरुवात झाल्यामुळे या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


 
Top