भूम (प्रतिनिधी)-शिवसेना पक्षप्रमूख उद्धव बाळासाहेब ठाकरे व धाराशिव विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर  व माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या बदल पालकमंत्री तानाजीराव सावंत यांनी अपशब्द वापरल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भूम येथे जमावबंदी आदेश लागु असताना तानाजी सावंत यांच्या विरोधी एकत्र जमा होऊन घोषणाबाजी केली. एकत्र आल्याने जमावबंदी आदेशाचे उलंघन केल्यामुळे ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांवर भूम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या संबधी समस देऊन सोडण्यात आले आहे 

दिनांक 12 रोजी मुख्य गोलाई चौक या ठिकाणी तानाजी सावंत यांच्या फोटोला चपलाने मारून त्यांचे विरुद्ध घोषणाबाजी करून करत होते. मी तेथे हजर असणारे लोक कोण आहेत हे पाहिले सदरील आंदोलक यांनी कुठलीही परवानगी अगर निवेदन दिले नसल्याचे सांगीतले.  सर्व अंदोलक यांनी कुठलेही निवेदन अगर पूर्व कल्पना न देता जिल्हाधिकारी धाराशिव यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन शासकिय आदेशाची पायमल्ली केली असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पाक्षाचे शिवसेना भुम तालुका प्रमुख ॲड श्रीनिवास जाधवर, उपजिल्हा प्रमूख चेतन बोराडे, प्रल्हाद आडगळे, शिवसेना विधानसभा समन्वयक दिलीप शाळू, संग्राम लोखंडे, शंकर गपाट, महिला आघाडी जिल्हा प्रमुखजिन्नत सय्यद, ताई लांडे यांच्यासह अनेकांवर संदेश पंडीत क्षिरसागर यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 
Top