धाराशिव (प्रतिनिधी)-तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील मांजरा शुगर (कंचेश्वर) इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याने पहिल्याच गळीत हंगाम 2023-24 मध्ये चार लाख दहा हजार मे. टन उसाचे गाळप करून हंगाम यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. या गळीत हंगामाची सांगता सोमवारी (दि.11) सत्यनारायण देवताची पूजा करून लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते गव्हाणीची विधीवत पूजा करून करण्यात आली.

सहकार महर्षी व महाराष्ट्राचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मांजरा शुगर इंडस्ट्रीज कारखान्याची वाटचाल सुरू असून गाळप हंगामात 29 फेब्रुवारी 2024 अखेर ऊस पुरवठा केलेल्या शेतकयांना उसाचा पहिला अडव्हान्स हप्ता 2600 रुपये प्रमाणे त्यांचे बँक खात्यात जमा केला आहे. यावेळी धीरज देशमुख यांनी हंगाम यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल सर्व खाते प्रमुख विभागप्रमुख कर्मचारी ऊसतोड वाहतूक मजूर यांचे आभार मानले. कार्यक्रमास रेणा कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, 21 शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्याम भोसले, व्हाईस चेअरमन सचिन पाटील, तसेच विलास शुगर-1 कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवी काळे, जागृती कारखान्याचे जनरल मॅनेजर गणेश येवले, मांजरा शुगर कारखान्याचे जनरल मॅनेजर सतीश वाकडे, जनरल मॅनेंजर रामानंद कदम, जनरल मॅनेजर अजित कदम, डिस्टीलरी मॅनेजर उत्तम हायकर, चीफ केमिस्ट सुंदरराव साळुंखे, सर्व खाते प्रमुख, विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top