धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व धाराशिव जिल्हा तायक्वाँदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस मुख्यालयातील मैदान येथे दि.02. मार्च 2024 रोजी पासून तायक्वाँदो या ऑलंपीक खेळाचे प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. 

तायक्वाँदो या ऑलंपीक खेळाचे प्रशिक्षण ही काळाची गरज आहे. तसेच तायक्वॉदो या ऑलंपीक खेळाच्या प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, राखीव पोलीस निरीक्षक आरविंद दुबे, धाराशिव जिल्हा तायक्वॉदो असोसिएसनचे सचिव तथा मुख्य प्रशिक्षक राजेश महाजन, तायक्वॉदो प्रशिक्षक स्मिता गायकवाड, माधव महाजन सर्व तायक्वॉदो खेळाडू उपस्थित होते.


 
Top