धाराशिव (प्रतिनिधी)- पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून पोलीस कल्याण विभाग अंतर्गत धाराशिव पोलीस मुख्यालय येथील कवायत मैदान येथे पोलीसांच्या प्रशिक्षणासाठी व फिटनेससाठी ऑफस्टीकल, ओपन जिम, पुरुष पोलीस अंमलदार व महिला पोलीस अमंलदार यांचे साठी बॅरेक सुरु करण्यात आले. याचा शुभारंभ आज दि.16 मार्च 2024 रोजी छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक देविंद्र मिश्र, यांच्या हस्ते व जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, यांचे उपस्थितीत करण्यात आले. उदघाटनासाठी पोलीस निरीक्षक मनोज कुमार राठोड, आजीनाथ काशीद, राखीव पोलीस निरीक्षक दुबे, व इतर पोलीस अधिकारी, अमंलदार तसेच कार्यालयनी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top