तुळजापूर (प्रतिनिधी) - शिवसेना नेते तथा माजी मुखमंञी उध्दव ठाकरे यांच्या तुळजापूर जाहीर सभेला मिळालेला मतदारांचा प्रतिसाद हा महायुतीला चिंतन करायला लावणार आहे.

तुळजापूर येथील जाहीर सभेचा प्रचार म्हणावा तसा झाला होता त्यातच वेळ राञीची होती. त्यामुळे सभा ऐकण्यासाठी मतदार येईल का, खुर्चा भरुन जाईल का असे राजकिय जाणकारांना वाटत होते. याला कारण ही तसेच होते. महायुतीच्या जाहीर सभेत प्रमुख नेत्यांचे भाषणे चालु असताना मोठा प्रमाणात रिकाम्या होत असलेल्या खुर्चाचे दृश्य पार्श्वभूमीवर ही सभा फेल होते कि काय वाटत असतानाच सभेला प्रचंड गर्दी पाहुन उध्दव ठाकरे यांनी प्रथम जाहीर सभा घेतली व नंतर श्रीतुळजाभवानी दर्शनाला प्राधान्य दिले.

विशेष म्हणजे तुळजापूर तालुक्यात शिवसेनेची ताकद नगण्य आहे. आमदार भाजपचा अशी राजकिय परिस्थिती असताना ही'  मतदारांनी थांबुन उध्दव ठाकरे व सुषमाताई अंधारे यांचे भाषण ऐकले. याचा पुरेपुर लाभ भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर घणघणीत आरोप करुन घेतला. महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेची शपथ घेवुन भाजपवर घणघणीत आरोप केले. तर सुषमा अंधारेनी महायुतीच्या सर्व नेत्यांनी शिवसेनेवर केलेल्या हल्याला प्रत्युत्तर दिले. महागाई, आरक्षण, खोटे आश्वासने यावरुन सरकारची पोलखोल केली. नरेंद्र मोदी, अमित शहा वर टिका करुन निलेश राणेचा बापा संभ्रवस्था कथन केली. एकंदरीत नेतृत्व नसताना खर्च न करता घेतलेल्या सभेस मिळालेला प्रचंड प्रतिसाद महायुतीसाठी धोक्याची घंटा वाजवणारा ठरणारा असल्याची चर्चा चर्चिली जात आहे.


 
Top