परंडा (प्रतिनिधी)- येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक अमर गोरे यांना नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर या विद्यापीठाने शिक्षणातील उच्च पदवी विद्यावाचस्पती (पीएचडी) देऊन सन्मानित केले आहे.    

गोरे यांनी डेव्हलपमेंट ऑफ युजफुल सिंथेटिक मेथोडोलॉजी फोर हेटरोसायकलिक मोलेक्युल्स या विषयावर प्रबंध विद्यापीठाला सादर केला होता. त्यांना श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा जिल्हा धाराशिव येथील रसायनशास्त्र विभाग प्रमुख व संशोधन मार्गदर्शक डॉ. व्ही. एस. इंगळे यांचे मार्गदर्शन लाभले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी ऑनलाइन पद्धतीने पीएचडी परीक्षेचे आयोजन केले होते. या तोंडी परीक्षेमध्ये प्रा.अमर गोरे पाटील यांना दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी  नोटिफिकेशन प्राप्त झाले. गोरे यांना मिळालेल्या या उच्च पदवीमुळे श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर यांनी अभिनंदन केले. त्यांच्या या यशामुळे शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालय परंडा येथील प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांच्या हस्ते बुके शाल देऊन सत्कार करण्यात आला. 
Top