तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील कोळेकरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा संपन्न झाला.

बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तू कोळेकर व राधाबाई कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. बाल आनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका अर्चना पाटील, सहशिक्षका शांता सलगर, सविता कोळेकर यांनी परिश्रम घेतले.


 
Top