धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील मौजे कुमाळवाडी येथे वंचित बहुजन युवक आघाडीच्या नाम फलकाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष मा. शितल अण्णा चव्हाण यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मा. बाबासाहेब जानराव हे होते.

सर्व महापुरुषांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.त्यानंतर आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा उचित सत्कार मौजे कुमारळवाडी शाखेच्या वतीने करण्यात आला.त्यानंतर या मौजे कुमाळवाडी ग्राम शाखेवरती पदाधिकारी म्हणून निवड झालेल्या

अध्यक्ष पैगंबर खोंदे, उपाध्यक्ष सलमान मुजावर, महासचिव  प्रकाश पौळ, सचिव  ऋषि ढोणे, कोषाध्यक्ष बाबुराव पौळ, प्रसिद्धीप्रमुख अमोल कांबळे, संघटक संतोष कांबळे, सल्लागार महेश नागटिळक, सदस्य मुबारक मुजावर, संतोष ढोणे,सागर पौळ, आकाश पौळ,मंजूर मुजावर, शहबाज मुजावर, आनंद ढोणे, दीपक बनसोडे, सचिन कांबळे, सुलतान मुजावर आदी पदाधिकाऱ्यांचा सत्कार वंचित बहुजन युवक आघाडी धाराशिव जिल्हा कार्यकारणी यांच्या वतीने करण्यात आला. व त्यांच्या पुढील राजकीय कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असलेले मान्यवर, वंचित बहुजन आघाडी धाराशिव जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव, जिल्हा कोषाध्यक्ष विद्यानंद वाघमारे, युवक आघाडीचे जिल्हा प्रवक्ते गोविंद भंडारे, युवा नेते बाळासाहेब कदम आदींनी आपले विचार मांडले, यावेळी युवक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष लोंढे, युवा जिल्हा संघटक काशिनाथ उर्फ बाबा वाघमारे, धाराशिव तालुका युवक अध्यक्ष सागर चंदनशिवे, तालुका उपाध्यक्ष मोहन वाघमारे,तालुका संघटक मनीष कांबळे, युवा कार्यकर्ते संतोष साबळे, फादर बॉडीचे ग्राम शाखाध्यक्ष  सतीश कांबळे संघटक नितीन कांबळे आदी पदाधिकाऱ्यांसह पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन युवक आघाडीचे धाराशिव तालुका संघटक  मनीष कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा जिल्हा प्रवक्ते गोविंद भंडारे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार  शाखा अध्यक्ष पैगंबर खोंदे यांनी मानले.

 

 
Top