धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्हयात आपुऱ्या पावसामुळे दिवसेंदिवस ग्रामीण व शहरी भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असून याबाबत भविष्यात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ज्या गावात कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजनेव्दारे गावास पाणीपुरवठा होत नाही अशा ठिकाणी  विहीर, बोअर आधिग्रहण तसेच आवश्यक  ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर चालू करणे बाबत सविस्तर अहवाल तयार करावा व कुठलाही नागरीक पिण्याच्या पाण्यापासून वंचीत राहू नये यासाठी आपण जिल्हा स्तरावरुन टंचाईचा कृती आराखडा तयार करावा. त्यासाठी आवश्यक त्या निधीची मागणी शासनाकडे करावी अशी सुचना खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.  


 
Top