धाराशिव (प्रतिनिधी)-पानगाव (ता. कळंब) येथे कर्ज  फेडण्यासाठी वडील शेत विकण्यास परवानगी देत नसल्याने मुलानेच वडिलांच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दखल झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार पानगाव येथील देविदास भाऊाव वाघमारे वय 68 हे शेतात झोपण्यासाठी गेले होते. ते सकाळी मृतावस्थेत आढळून आले. पोलिसांनी मुलाची चौकशी केली असता कर्ज फेडण्यासाठी वडील शेत विकण्यास परवानगी देत नव्हते. त्यामुळे वडिलांचा झोपेतच दगड घालून खून केल्याचे त्यांने कबूल केले. वृंदावनी वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे.


 
Top