धाराशिव  (प्रतिनिधी) - लोकसभा निवडणूका तोंडावर आल्याने सर्वच राजकीय पक्ष सपाट्याने कामाला लागले असून त्याचाच एक भाग म्हणून धाराशिव जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन युवक आघाडीने युवकाचे संघटन बांधण्यासाठी मोठी मोहीम आखल्याचे दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर  यांच्या बहुजन वर्गाला सत्तेमध्ये स्थान मिळवून देण्याच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी वंचित  बहुजन युवक आघाडीने जिल्ह्यामध्ये गाव तिथे शाखा ही संकल्पना राबवत पक्षाचे संघटन मजबूत बनवत युवक जिल्हाध्यक्ष शितल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली युवक आघाडीने आपल्या कामाची दमदार सुरुवात केली आहे. निवडणुका जवळ येत असल्याने सर्वच राजकीय पक्ष वेगाने कामाला लागले असून त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीही अग्रेसर दिसत आहे.दि.10 मार्च रोजी सायंकाळी धाराशिव तालुक्यातील आरणी येथील युवक आघाडीच्या ग्राम शाखेचे उदघाटन वंचित बहुजन युवक आघाडी चे जिल्हा अध्यक्ष शितल चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले.तसेच युवक शाखा अध्यक्षपदी संतोष शिरसाठ यांची निवड करण्यात आली.

या वेळी वंचित बहुजन आघाडी धाराशिव जिल्हा महासचिव बाबासाहेब जनराव,जिल्हा कोषाध्यक्ष विद्यानंद वाघमारे,नेते संतोष केंदले,महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष अनुराधा लोखंडे,जिल्हा महासचिव रुक्मिणी बनसोडे,जिल्हा युवक प्रवक्ते गोविंद भंडारे,जिल्हा युवक संघटक बाबा वाघमारे,युवक तालुका अध्यक्ष सागर चंदनशिवे,युवक उपाध्यक्ष मोहन वाघमारे,युवक ता. सचिव शुभम शिंदे,युवक ता. सहसचिव सचिन गजधने, तुळजापूर तालुका युवा संघटक विनायक दुपारगुडे,युवा नेते अजय कदम,आदी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह संतोष साबळे,पवन होवाळ,अक्षय ताकपेरे,यांच्यासह गावातील सर्व जाती धर्मातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


 
Top