धाराशिव (प्रतिनिधी)-मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीला लाथ मारून शेतकरी कामगार पक्षात सर्वसामान्य लोकांसाठी काम केले. भाई उध्दवराव पाटील यांचा यामुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रात नावलौकिक होता. धाराशिव जिल्हा हा भाई उध्दवराव पाटील यांचा जिल्हा म्हणून ओळखला जात होता. परंतु परवा पालकमंत्री यांनी उध्दव ठाकरे यांच्या दौऱ्याचा उल्लेख करत खासदार ओमराजे यांच्या वडीलांविषयी व माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या विषयी जी खालच्या पातळीची टिका केली. त्यामुळे धाराशिव जिल्हा बदनाम होत आहे, अशी टिका माजी नगराध्यक्ष तथा ठाकरे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

सोमवार दि. 11 मार्च रोजी सायंकाळी बोलविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पालकमंत्री तानाजी सावंत यांनी रविवारी जी भाषा वापरली. त्याबद्दल मकरंद राजेनिंबाळकर यांनी स्पष्ट शब्दात निषेध व्यक्त केला. आजपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी अशा प्रकाराची भाषा वापरली नाही. त्यामुळे अशी मानसिकता असणाऱ्या लोकप्रतिनिधीला जिल्ह्यातून सर्व पक्षांनी मिळून हद्दपार करावे असे आवाहनही मकरंद राजेनिंबाळकर यांनी केले. नगराध्यक्ष असताना आपल्याला अत्यंत वाईट अनुभव आला. 


खरे भगीरथ विलासराव 

कृष्णा खोऱ्यातील वाया जाणारे पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळविण्याच्या महत्वपूर्ण निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी घेतला. त्यावेळस त्यांना मधुकरराव चव्हाण यांनी मोठे योगदान दिले आहे. 2004 पासून या योजनेचा पाठपुरावा केल्यामुळेच हे पाणी येत आहे. खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी या योजनेसाठी तत्कालीन जलसिंचनमंत्री जयंतराव पाटील यांची भेट घेवून प्राधान्यक्रम बनविला. त्यानुसारच कामे होत आहेत. त्याचवेळेस खासदार ओमराजे निंबाळकर यांनी येत्या जून-जुलैमध्ये पाणी येईल अशी घोषणा केली होती. मात्र आता सध्या मीच पाणी आणले असा आवा आणत श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न पालकमंत्री सावंत करत आहेत अशी टिका ही मकरंद राजेनिंबाळकर यांनी केली. 


 
Top